TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पक्षासाठी लढणारा भाजपचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण : माजी आमदार साहेबराव घोडे !

सरकार व दुध संघाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणार : आमदार मंगेश चव्हाण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2022
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील राजपूत मंगल कार्यालय येथे चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण (mangesh chavhan) यांची जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रुपाने चाळीसगाव तालुक्याला जळगाव जिल्हात मानाचे स्थान मिळाले, दुध संघात चाळीसगाव तालुक्याची मान उंचावली त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील श्री विठ्ठलाची मूर्ती, बागायतदार रुमाल, भेट देऊन व भगवा फेटा बांधून आमदार मंगेश चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (chalisgaon news)

सत्काराला उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास तसेच आपल्या नेतृत्वाचा आणि जनतेचा विश्वास संपादित केल्यास आपल्याला पद आणि जबाबदाऱ्या मागायची वेळ येत नाही तर त्या जबाबदाऱ्या आपसूकपणे आपल्याकडे येतात. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन तसेच राज्य शासनाच्या व विकास दुध संघाच्या माध्यमातून येत्या काळात किमान १ हजार कोटी रुपयांची विकासकामे चाळीसगाव तालुक्यात आणायची असून त्यातील ७० टक्के कामे आपल्या कालावधीतच पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

READ ALSO

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

तसेच नवीन निवडणुका झालेल्या २२ ग्रामपंचायतीना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले.सोबतच ज्याप्रमाणे आजपर्यंत आशा-अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या जवळपास ५० लग्नांसाठी मामा म्हणून प्रत्येकी २५ हजारांची मदत केली त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा कणा असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी २० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा आमदार चव्हाण यांनी केली.

माजी आमदार साहेबराव घोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पक्षासाठी लढणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण होय… जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रमाणे सहकारात देखील भाजपा पुढे गेल्यास निश्चितपणे त्याचा फायदा पक्षाला व कार्यकर्त्यांना होतो मात्र जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी भाजपाला माघार घ्यावी लागली असता मी याबाबत खासदारांकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र ती कसर आमदार मंगेश चव्हाणांनी दुध संघाच्या निवडणुकीत भरून काढली. पूर्ण जागा बिनविरोध करा मात्र मी मुक्ताईनगर मधूनच लढणार असा निर्धार त्यांनी केला आणि आज त्या एका भूमिकेमुळे भाजपला दूध संघात घवघवीत यश मिळाले. दुसऱ्या मतदारसंघात जाऊन विजय तर मिळविलाच मात्र विजयी झाल्यानंतर त्यांनी विजयाचे श्रेय त्यांनी खडसेंच्या अहंकाराला देत सर्वांची मने जिंकली. मंगेश चव्हाणांच्या मामाचे घर माझ्या शेजारी असल्याने अगदी लहानपणापसून त्यांचा संघर्ष मी बघत आलो आहे. त्यांनी स्वकर्तृत्वाने आजपर्यंत मिळविले असून नेतृत्व, दातृत्व, कर्तुत्व आणि सहृदयत्व याचा संगम मंगेश चव्हाण आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे प्रतिपादन माजी आमदार घोडे यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मधु भाऊ काटे, सचिन पान पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, ज्येष्ठ नेते सुरेश तात्या सोनवणे, आनंदा अण्णा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम सर, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती माजी सभापती संजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक संजय रतन सिंग पाटील, माजी नगराध्यक्ष आशालताताई चव्हाण, जेष्ठ नेते विश्वासभाऊ चव्हाण, माजी मार्केट सभापती मच्छिंद्र भाऊ राठोड, रवी आबा पाटील, सरदार शेठ राजपूत, ज्येष्ठ नेते राजू अण्णा चौधरी, रमेश सोनवणे सर, ए ओ पाटील सर, शेषराव बापू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश भाऊ बोरसे, सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीष बऱ्हाटे, दूध संघ संचालक रावसाहेब भोसले, भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल दादा पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ भाऊ पाटील, प्रेमचंद काही खिवसरा, नमोताई राठोड, विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, रिजवानाताई खान, एडवोकेट धनंजय ठोके, हेमराज बाविस्कर, किशोर भाऊ पाटील, नितीन भाऊ पाटील, बाळासाहेब राऊत, आबा पाटील पोलीस, सुभाष दादा पाटील, रवी बापू पाटील, चिराग शेख, चंदू भाऊ तायडे संभाजी राजे पाटील, पियुष दादा साळुंखे, अलक नंदाताई भवर, राजू बाबू राठोड, डॉक्टर महेंद्र राठोड, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, भैय्यासाहेब पाटील, जगदीश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बागुल, महेश शिंदे, अयास पठाण, शिवदास महाजन, सुनील पवार यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. भाजपा शहर व ग्रामीण मंडळाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांना सन्मानपत्र देणून गौरविण्यात आले. तसेच मधुभाऊ काटे, के बी दादा साळुंखे, घृष्णेश्वर पाटील, अमोल नाना पाटील, रवि बापू पाटील, सरपंचांच्या वतीने शैलेंद्रसिंग पाटील, जितेंद्र वाघ यांनी आपली यथोचित मनोगते व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

June 16, 2025
चाळीसगाव

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

June 14, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
चाळीसगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बनावट जॉईनिंग लेटर देऊन तरुणीची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
Next Post

बोरगाव खुर्दचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंचांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द’ : संजय राऊत

January 26, 2022

जळगावात हाणामारी ; दोन भाऊ जखमी !

September 19, 2020

मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; सरकारला दिले ‘हे’ उपाय

April 18, 2021

राज ठाकरे ‘एजंट’ चे काम करतात : गुलाबराव पाटील

May 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group