चाळीसगाव (प्रतिनिधी) आपल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या वर्षभरापासून चाळीसगाव मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु केला आहे, या विकास कामांमध्ये आता चाळीसगाव शहरातील अजून १५ कोटींच्या कामांची भर पडली आहे. चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील २० महत्वाचे रस्ते व खुली जागा विकसित करणे कामांसाठी ११ कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला आहे यासोबतच प्रभाग क्र.५ मधील नागरिकांची गेल्या ४० वर्षांपासून आरोग्यासह जीवितासाठी अवघड समस्या बनलेल्या नाल्याच्या बंदिस्त बांधकामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाल्याने प्रभाग क्र.५ व १४ मधील नागरिकांचा वर्षानुवर्ष प्रलंबित महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
शहरातील पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजना कामांमुळे खोदलेल्या रस्त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, याबाबत शहरवासियांना दिलासा देण्यासाठी गेल्या वर्षभरात २५ कोटींचा निधी रस्त्यांच्या कामांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी मंजूर करून आणला आहे.
काय आहे प्रभाग क्र.५ मधील नाल्याच्या प्रश्न ?
नदी – नाले यांना आपण वरदान समजतो मात्र चाळीसगाव शहरातील प्रभाग क्र.५ मधील नाला गेल्या ४० वर्षांपासून या भागातील नागरिकांसाठी श्राप ठरला आहे, अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले, अनेकांचे आश्वासने हवेत विरले मात्र नागरिकांच्या जीवावर उठेलेल्या या नाल्याची समस्या मात्र सुटली नाही, कृषी उत्पन्न बाजार समिती पासून सुरु होणारा शहरातील हा नाला पुढे प्रभाग क्र.५ व ४ मधून गांढूळ खत प्रकल्पाच्या जवळ तितूर नदीला मिळतो, सुमारे २ किमी अंतराच्या या नाल्याचा सर्वाधिक त्रास हा प्रभाग क्र.५ व १४ मधील नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यावर घरात दुर्गंधीयुक्त खराब पाणी, मोठ्या अळ्या घुसणे हे दुष्टचक्र दरवर्षी ठरलेल… २ वर्षांपूर्वी अवघ्या १२ वर्षाची अल्पसंख्यांक समाजाची मुलगी नाल्यात पडून वारली, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाला ओलांडून जाण्यासाठी दररोजची जीवघेणी कसरत नित्याचीच… गेली ४० वर्ष या भागातील नागरिकांच्या आरोग्याची व जीविताची हि समस्या मात्र कुठल्याच लोकप्रतिनिधीला मार्गी लावता आली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. गेल्यावर्षी पावसाळ्यात एका रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण आले असता त्यांनी हि विदारक परिस्थिती पाहिली, सगळीकडे नाल्यामुळे झालेली अस्वच्छता, दुर्गंधी हे पाहून त्यांनी सदर नाल्याला बंदिस्त करून हि समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार आमदार चव्हाण यांनी पहिल्या टप्प्यात प्रभात गल्ली शनी मंदिर ते गरीब नवाज सोसायटी या भागातील नाला बांधकामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हि बातमी समजताच प्रभागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून गेल्या ४० वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने आता आमची पुढची पिढी हि समस्या पाहणार नाही असा आशावाद व्यक्त करत आहेत.
चाळीसगाव शहरातील नव्याने मंजूर २० रस्त्यांची कामे खालीलप्रमाणे…
नगरविकास विभाग – वैशिष्ट्यपूर्ण निधी – १० कोटी
१ ) प्र. क्र.९, शांतीनगर १८ मी. रुंद रस्त्यापासून ते हिरापूर रोड पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.- ९० लाख
२ ) मालेगाव Y पॉईंट ते हॉटेल आशिष पर्यंत सर्विस रोड सुधारणा करणे. – १०० लाख
३ ) जय बाबाजी चौक शिंदे मामा ते एस. डी. पाटील सर यांचे घरापासून ते कोदगांव रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ५० लाख
४) पाटबंधारे ऑफिस ते सि.ए. भूषण भोसले ते डॉ. विजय पाटील ते समर्थ हॉस्पिटल पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ५० लाख
५ ) कोर्टापासून ते घाटे पेट्रोल पंपापर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ५० लाख
६ ) हनुमानवाडी, बाळासाहेब मोरे यांचे घरापासून ते धर्मार्थ दवाखान्यासमोर पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ४० लाख
७) १८ मी डी.पी. रस्त्यापासून ते शासकीय ITI मुलींच्या वस्तीगृहा पर्यंत रस्ता सुधारणा करणे.- २५ लाख
८ ) भडगांव रोड, समर्थ मॉल ते एस. टी. पाटील सर ते अजिंक्य बिल्डिंग ते डॉ. प्रमोद सोनवणे ते खरजई रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे.- ९० लाख
९ ) ठाकूरसिंग महाराज सत्संग हॉल ते रवींद्र गिरधर चौधरी यांचे घर ते सुरेश स्वार यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ८५ लाख
१० ) स्वामी समर्थ केंद्र ते नवा मालेगांव रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ५० लाख
११ ) भडगाव रोड ते योगेश प्रोव्हिजन ते वेदमंजिरी ते सतीश शिरुडे ते प्रदिप एकनाथ शिरुडे यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ७० लाख
१२ ) अॅड. प्रशांत पालवे यांच्या घरापासून ते कामगार भवन पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ३० लाख
१३) प्र. क्र. १७ मधील छायादिग्राम व पोदार शाळा परिसरातील रस्ते सुधारणा करणे. -१०० लाख
१४) शाहू मराठा मंगल कार्यालय पासून ते जिनगरवाडी पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ४० लाख
१५ ) मदिना मस्जिद ते गरीब नवाज चौकापर्यंत रस्ता सुधारणा करणे. – २० लाख
१६ ) हनुमानवाडी, राजपाल यांचे बिल्डींग पासून ते हॉटेल विराम स्टेशन रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ४० लाख
१७ ) हनुमानवाडी राणा यांचे घरापासून ते स्टेशन रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ४० लाख
१८ ) डॉ. अभिमन्यू राठोड ते डॉ. नरेंद्र राजपूत ते देवकर मळापर्यंत रस्ता सुधारणा करणे. – ३० लाख
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना – ५ कोटी
1) प्रभाग क्रमांक ५ मध्ये नाला बांधकाम करणे – ४ कोटी रुपये,
2) प्रभाग क्रमांक ८ मध्ये अंतर्गत रस्ता सुधारणा करणे – ३५ लाख,
3) प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रबुद्ध नगर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे – ३५ लाख
4) प्रभाग क्रमांक ३ येथील गट क्रमांक ४७१/१क मधील खुल्या जागेत सुशोभीकरण करणे – ३० ला