अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आणि अवघ्या पंधरा दिवसातच आमदार निधीतून मिळालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. रत्नापिंप्री ग्रामपंचायती अंतर्गत रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री या तीन गावांचा समावेश होता.
या तीनही गावात पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडून सरपंच व उपसरपंच पदांची निवड झाली आणि अवघ्या पंधरा दिवसातच आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधी २५१५ मधून मंजूर कामांच्या भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधीतून रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री गावातील रत्नापिंप्री ते चिखलोद रस्ता रस्ता खडीकरण (अंदाजित रकम १० लक्ष), श्री दत्त मंदिर (दबापिंप्री) येथे सामाजिक सभागृह (अंदाजित रकम ८ लक्ष), होळपिंप्री येथे काँक्रीटीकरण (अंदाजित रकम ५ लक्ष), रत्नापिंप्री ते चिखलोद रस्ता डांबरीकरण (अंदाजित रकम १८ लक्ष) असे विविध कामांना आमदार मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या आवारात आमदार अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच सदस्य यांच्या ही सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी गाव विकासाची कामे हाती घेतल्यानंतर आज प्रथमच विविध विकास कामांचे भूमिपूजन केल्याने गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुनिता पाटील, उपसरपंच अंकुश भागवत, अधिकार पाटील, सुनील पाटील, सुमनबाई भिल, सीमा पाटील, राहुल सरदार, संदीप भिल, कविता पाटील, दिपाली मराठे, वर्षा पाटील यांचा सत्कार आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आमदार अनिल पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानत आपल्या गावातील विकास कामे करून देण्याचे आश्वासन दिले तर सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्ग याबाबत प्रतिबंधात्मक उपाय आणि सावधगिरी बाळगावी असेही सांगितले. प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत असताना लावणे तसेच शासन नियमाप्रमाणे कुठे गर्दी करु नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये मोठे कार्यक्रमांमध्ये मोजक्या लोकांमध्ये कार्यक्रम करून घ्यावी असे आमदारांनी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, कामगार नेते एल.टी.पाटील, अमळनेर न.प. नगरसेवक दिपक पाटील, पं.स.सदस्य अमोल पाटील, द.सबगव्हाणचे सरपंच नंदलाल पाटील, शेळावे ग्रा पं सदस्य बंटी पाटील, डी.डी.पाटील, रामकृष्ण पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, माजी सरपंच भिकनराव पाटील, रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकनराव पाटील यांनी केले तर आभार राहुल सरदार यांनी मानले.