मुंबई (वृत्तसंस्था) मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासह त्यांच्या आईनाही कोरोना झाला आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. राज आणि त्यांच्या आईंना कोरोनाची सुक्ष्म लक्षणं असून ते घरीच उपचार घेत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे. सध्या दोघांवरही ठाकरे यांच्या राहत्या घरी उपचार सुरु आहेत.