ठाणे (वृत्तसंस्था) टेबलवर उभे राहून राज ठाकरे सभा घेतली, पण येत्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठणकावून सांगितलं. साहेबांच्या सभेसाठी लहान जागा नकोच, असंही ते म्हणाले.
येत्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आहे. ठाण्यात जागा आणि मैदाने कमी आहेत. दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्याने परवानगी पोलीस परवानगी देत नाहीत. सभा घेणार तर कुठे घेणार? परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावरच सभा घेणार. गडकरी रंगायतनच्या बाहेर रस्त्यावर पाहणी करणार. राज्य सरकारबाबत बोलायचे नाही. नामावली बंधने करत असतात. मात्र आम्ही शिवतीर्थावर सभा घेतली होती. निर्बंध घातले तरी आम्ही सभा घेणारच. टेबलवर उभे करून राज ठाकरे यांना भाषण करावे लावणार. मात्र सभा ही होणारच हे नक्की आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठणकावून सांगितलं. साहेबांच्या सभेसाठी लहान जागा नकोच, असंही ते म्हणाले.
मनसे नेते बाळा नांदगावकर आज ठाण्यात आले होते. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे यावेळी पोलिस आयुक्तांच्या भेटीला आले होते. राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन बाहेर घेण्यात येणार आहे. त्याला परवानगी देण्यात यावी म्हणून नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांशी संवाद साधला. पोलिस आयुक्त जयजीत सिंग, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षण संजय धुमाळ आदींशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडिशी संवाद साधताना हा इशारा दिला. येत्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याआधीच नौपाडा पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना जागेच्या संदर्भाने समजपत्रं दिलं आहे.
त्यावर साहेबच बोलतील
भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेमध्येच नाराजी सुरू झाली आहे. त्याबाबतही नांदगावकर यांना विचारण्यात आले. मात्र, या विषयावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. या विषयावर स्वत: राज ठाकरे बोलतील. आम्ही न बोललेलं बरं, असं नांदगावकर म्हणाले. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा कायदा आहे. त्यावर साहेब बोलतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.