जळगाव (प्रतिनिधी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून त्या पार्श्वभूमीवर जळगाव आगारात आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना भेटून जळगांव जिल्हा मनसे तर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. याबाबत ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र सुद्धा दिले आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये असे निवेदन सुद्धा जळगाव विभाग नियंत्रक यांना देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जनहित कक्ष शहर अध्यक्ष संदीप मांडोळे, योगेश पाटील, कुणाल पवार, गौरव जोनवाल, पंकज चौधरी, किरण पाटील आदी उपस्थित होते.