भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून संपूर्ण राज्याचे तीन तेरा वाजले आहे. कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे, असे आदेश मनसे नेते अॅड.जयप्रकाश बाविस्कर यांनी दिले. ते भुसावळ येथिल कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी जिल्हा सचिव ऍड जमील देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे,तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे,चेतन आढळकर, विनोद पाठक, रीना साळवी उर्वशी गोसावी मंचावर उपस्थित होते. मुक्ताईनगर, यावल,भुसावळ, मलकापूर, एरंडोल,जळगांव,चोपडा येथील राहुल काळे,ऋषीकेश पाटील,संजय नंनवरे,विशाल सोनार,रझाक सय्यद,समद कुरेशी,यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्र संचालन राजेंद्र निकम यांनी केले. प्रस्ताविक विनोद पाठक यांनी केले तर आभार रीना साळवी यांनी मानले.