मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी तिकीट काढून मुलांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला. यावर काँग्रेसने टीका करत रविवारी शाळेला सुट्टी असते. त्यामुळे प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?,असा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधील काही विद्यार्थ्यांनी तसेच शालेय गणवेश घालतेल्या मुलांशीही संवाद साधला. मेट्रोच्या प्रवासात मोदींनी सोबत असलेल्या मुलांचे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटला शेअर केले आले आहेत. माझ्या तरुण मित्रांसोबत पुणे मेट्रो ट्रेनने प्रवास करत आहे, असे कॅप्शन यामध्ये लिहिले आहे. पंतप्रधानांनी गरवारे कॉलेज स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा मेट्रोचा प्रवास केला.
मोदींच्या मेट्रो रेल्वे प्रवासात त्यांच्या सोबत असलेली मुले शालेय गणवेशात असल्याने अनेकांनी रविवारीही शाळा सुरु असते का ?असा प्रश्न उपस्थित केला.अगदी यावरून पंतप्रधान मोदींवर टीकाही होत आहे. रविवार असल्याने विद्यार्थी शाळेच्या गणवेशात कसे असा सवाल करत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय !
“रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?,” असे महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.