पारोळा (प्रतिनिधी) येथील एका ठिकाणी राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात महेश धोंडू साळुंखे (वय ३१, रा. पारोळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास २५ वर्षीय महिला सजंय वाणी यांचे दुकानातुन किराणा माल घेवून घरी जात असतांना महेश साळुंखे (रा. पारोळा) याने पाठलाग केला. तसेच मला तुझा नंबर दे अशी सार्वजनीक ठिकाणी थांबवून विचारुन माझ्या स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मी मोबाईल नंबर देण्यास नकार दिला असता मी तुला सोडणार नाही अशी धमकी दिली, सदर बाबत मी माझे पती समाधान मरसाळे यांचे सह जावुन जाब विचारला असता त्याने आम्हास जा मांगट्यांनो तुमच्या कडुन जे होईल ते करुन घ्या, अशी जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात महेश धोंडू साळुंखे (वय ३१, रा. पारोळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.