पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत तीचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि १६ रोजी मुलीचे आई व वडील शेतात कामानिम्मित गेले असता, संशयित आरोपी संदीप रविद्र पाटील हा पिडीत मुलीच्या घरी येत इन्व्हटरची चिट्ठी मागत मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले. याप्रकरणी पारोळा पोलिसात संशयित आरोपी संदीप पाटील याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी राजू जाधव हे करीत आहेत.