जळगाव (वृत्तसंस्था) शहरातील हाँटेल रायल पॅलेस चौकात एका ३० वर्षीय महिलेचा हात पडून अश्लील संभाषण करून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी भगवान मोहन कुमावत (रा. बेलदारवाडी, जळगाव) याने हाँटेल रायल पॅलेस चौकात पिडीतेचा हात पकडून शहरी संबंधाची मागणी केली. पिडीतेने हात सोडवण्याचा प्रयत्न केल्यावर भगवानने पिडीतेस शिवीगाळ करत स्वतःचा जीव देण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.कॉ शांताराम पाटील हे करत आहेत.