TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाचखोर अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले घबाड ; दीड कोटीचे सोने जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी ७ शेतकऱ्यांकडे प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ३५ हजारांची लाच मागणी करून तडजोडीअंती २८ हजारांची लाच स्वीकारताना माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वर्ग-१ येथील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या मिरज (जि. सांगली) येथील युनियन बँकेच्या लॉकरमधून एसीबीच्या पथकाला अक्षरशः घबाड हाती लागले आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती करून सील केलेल्या लॉकरची झडती घेतली असता या लॉकरमध्ये तब्बल ११ लाख ८९ हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण १ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. यामध्ये सोन्याच्या १११४ ग्रॅम वजनाच्या ७ बिस्किटांचा समावेश आहे.

राजेश आनंदराव सलगरकर हा माजलगाव पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. २२ मे रोजी त्यास २८ हजार रुपयांची लाच घेताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सलगरकर हा मूळचा मिरज (जि. सांगली) येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ट्रॅप झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने अंबाजोगाई येथे त्याच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी मिरज येथील युनियन बँकेच्या लॉकरची चावी एसीबीच्या पथकाला मिळून आली होती. दरम्यान, हे लॉकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ३१ मे रोजी या लॉकरची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

यावेळी या लॉकरमध्ये तब्बल १ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. यामध्ये ११ लाख ८९ हजारांची रक्कम तसेच २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. ज्यामध्ये १११४ ग्रॅम वजनाची सात बिस्किटे आणि ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना राजेश सलगरकर याने ही संपत्ती कुठून मिळवली? याचा आता एसीबीचे अधिकारी हिशोब लावणार आहेत. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी केली. पोलीस अंमलदार भरत गारदे, अमोल खरसाडे, चालक अंबादास पुरी यांनी बँक लॉकरची झडती घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeBeedCrime

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा तालुक्यातून अट्टल चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

November 24, 2020

मुख्यमंत्री ठाकरेंसह दिग्गज नेत्यांचे बंगले BMCकडून डिफॉल्टर घोषित !

December 14, 2020

‘भिम आर्मी’ सामाजिक संघटनेची धरणगाव तालुका कार्यकारणी जाहीर !

February 25, 2022

जळगाव महानगरपालिकेची सत्ता प्रहार नक्कीच काबीज करेल : अनिल चौधरी !

August 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group