TheClearNews.Com
Friday, November 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित !

एमएसपीतर्फे व्ही.आर. पाटील यांचा नासिक येथे सन्मान !

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रिय गणित शिक्षक तथा मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांना शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने सन 2024 चा राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने नासिक येथे सन्मानित करण्यात आले. नासिक येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी शहाणे आणि सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामू यांच्या शुभहस्ते व्ही आर पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्काराचे प्रदान करण्यात आला.

व्ही. आर. पाटील हे पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या पंचवीस वर्षापासून गणित विषय शिकवत असून मुख्याध्यापक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने स्पर्धा परीक्षेत अनेक यश शिखरे पादाक्रांत केले आहेत. विशेष करून स्कॉलरशिप परीक्षा , राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांची प्रज्ञाशोध परीक्षा , नवोदय परीक्षा , आय आय टी मध्ये निवड, अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत विद्यालयाचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत.

READ ALSO

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

कोरोना काळात व्ही आर पाटील यांनी यु ट्यूब चॅनेल सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन गणिताचे प्रशिक्षण दिले तसेच स्पर्धा परीक्षा बाबत आणि इतर विविध परीक्षांबाबत, करिअर बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्ही आर पाटील यांच्या कार्यकाळात विद्यालयाचे अनेक विद्यार्थी नामवंत कंपनीमध्ये तसेच परदेशात मोठ्या हुद्द्यावर कार्य करीत आहेत आणि देश सेवा करीत आहे. व्ही आर पाटील यांच्या कार्यकाळात विद्यालय हे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे परीक्षा केंद्र , नवोदय परीक्षा , स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा केंद्र त्याचबरोबर इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळवत विद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये पर्यावरण विषयी जनजागृती निर्माण करणारे विविध उपक्रम राबवून त्यांनी संस्थेच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होणे आणि कठीण विषयांबद्दलची भीती दूर करण्यासाठी त्यांनी 1999 पासून विद्यालयात संस्थेच्या सहकार्याने रात्र अभ्यासिका सुरू केली असून त्या रात्रभसिकेच्या शाळेच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेत आपली गुणवत्ता वाढविली आहे. गुणवत्तेत अग्रेसर असलेले विद्यालयाचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत चार विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात अनेक गुणवत्ता वाढ उपक्रम त्यांनी राबविले आहेत व विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत नाशिक बोर्डात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राज्यस्तरी इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यालयाने सतत तीन वर्ष राज्य स्तरावर भरारी घेण्यात व्ही आर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

गणित आणि भूमिती विषय अतिशय मनोरंजक पद्धतीने शिकवून व्ही आर पाटील यांनी अनेक विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भीती दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गणिताच्या विशेष मार्गदर्शनासाठी त्यांनी विद्यालयात सकाळी सहा वाजता गणित विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू केलेले असून ते स्वतः विद्यार्थ्यांना गणिताचे मार्गदर्शन सतत करीत आहेत. तंत्रस्नेही, उपक्रमशील आणि गणिताचे व्यासंग असलेले पंकज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे सन 2024 या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे , हेमलताताई बोरोले, दिपालीताई बोरोले पंकजभैय्या बोरोले, नारायणदादा बोरोले आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच विविध विभागाचे प्रमुख, शिक्षक व कर्मचारी वृंद ,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दलचे सारे श्रेय संस्थेचे पाठबळ , संसाध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांनी नेहमी कार्य करण्यासाठी दिलेली ऊर्जा , संचालक मंडळ यांचं अनमोल सहकार्य, आई-वडीलांची प्रेरणा, कुटुंबीयांचे सहकार्य यांना दिले व राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्काराने झालेला गौरव हा एकट्याचा गौरव नसून संपूर्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व सहकारी शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याचा असल्याचे व्ही आर पाटील यांनी बोलून दाखवले व कार्य प्रेरणेसाठी संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या या दिमाखदार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी शहाणे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामू उपाध्यक्ष मेघा राणी जोशी सचिव सतीश कोळी सहसचिव राजश्री पाटील सर्व राज्य समन्वयक जिल्हा समन्वयक, शिक्षकवृंद नातेवाईक , मित्रपरिवार , माजी विद्यार्थी उपस्थित होते. राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांच्यावर पंचक्रोशीतील सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: chopadaPankaj vidyalaya

Related Posts

गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजले जळगावातील नवजीवन प्लस !

January 21, 2024

शिवसेना सरसावली ; लसीकरणासाठी धरणगावात विशेष मोहीम !

September 21, 2021

भुसावळात रात्री हवेमध्ये दोनवेळा गोळीबार ; गावठी कट्टा जप्त !

August 25, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ४ जुलै २०२४ !

July 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group