जळगाव (प्रतिनिधी) बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने कपाटातील साडेपचार हजार रुपये चोरुन नेले. ही घटना दि. २९ जून रोजी निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडी परिसरात घडली. या प्रकरणी शनिवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विठ्ठलवाडीतील रहिवासी भूपेश अरुण चव्हाण (वय ३४ रा. विठलवाडी निमग्वेदी शिवार हे टि २६ जून रोजी घर बंद करून बाहेर गेले होते. त्या वेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातून ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भूपेश चव्हाण यांनी दि. ५ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत