TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईच्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज केलं ; पहिल्याच प्रयत्नात मुलगा बनला पीएसआय !

धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील शुभम शिंदे झाला पहिलाच अधिकारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पतीच निधन झाल्यानंतर आईने आयुष्यभर केलेल्या कष्टाचं मुलाने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय होत चीज केलं आहे. धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील शुभम साहेबराव शिंदे या तरुणाने अवघ्या २५ व्या वर्षीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

धरणगाव तालुक्यातील चांदसर या छोट्याश्या गावातील शुभम साहेबराव शिंदे हा रहिवासी आहे. आई , एक बहिण शुभम याचा परिवार. बहिण मोठी तर शुभम हा लहान आहे. शुभमचे वडील हे खाजगी वायरमन होते. दहावीत शिकत असतांना , बोर्डाची परिक्षा सुरु असतांना शुभम याच्या वडीलांच निधन झालं होतं, आणि खेळण्याच्या वयात शुभमचं पितृछत्र हरपलं, तसेच घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. वडीलांच्या निधनानंतर दोन मुलांची आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी ही शुभमच्या आई सरला शिंदे यांच्यावर खांद्यावर येवून पडली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

यानंतर दोन्ही मुलांसाठी सरला शिंदे यांनी पदर खोचला आणि त्या घराबाहेर पडल्या. सरला शिंदे यांच्याकडे घरची सहा एकर शेती आहे. ही शेती करण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू नये म्हणून सरला शिंदे ह्या दुसऱ्यांच्या शेतात सुध्दा मजूर म्हणून कामाला जावू लागल्या. आपल्या शेतातील कामे संपली की त्या इतरांच्या शेतात मजुरीसाठी जायच्या. अशा पध्दतीने सरला शिंदे यांनी मुलगा शुभम आणि मुलगी अशा दोघांचे शिक्षण पूर्ण केलं.

पुढं पत्र्याचं आणि मागे मातींच …अशा घरात शुभम हा वाढला. सरला शिंदे ह्या कुठेही शुभमच्या शिक्षणात कमी पडल्या नाहीत. शुभम याने दहावीपर्यंत शिक्षण गावातचं पूर्ण केलं, त्यानंतर बारावी तसेच पुढील शिक्षण त्याने जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात पूर्ण केलं. शुभम याने केमिस्ट्री या विषयात पदवी घेतली, आणि त्यानंतर ऑरग्यानिक केमस्ट्रिी या विषयात पदवीत्तुर पदवी सुध्दा घेतली. त्यानंतर काही काळासाठी एका खाजगी कंपनीत सुध्दा शुभमने काम केलं. पदवीला शिकत असतांना शुभम हा खाजगी क्लासच्या सेमीनार साठी गेला होता. यादरम्यान याठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई वडीलासोबत सत्कार करण्यात आला. मुलाबरोबरच आई वडीलांचा सत्कार होतोय, हे पाहून याचठिकाणी शुभम याने अधिकारी होण्यांची मनाशी खूनगाठ बांधली. शुभम याला सुरुवातीपासून पोलीस खात्यांच विशेष आकर्षण होतं, त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून पोलीस उपनिरिक्षक होण्याचा शुभमने निर्णय घेतला.

मित्रांच्या माध्यमातून पदवीचं शिक्षण घेत असतांनाच शुभम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेतली होती, त्यानंतर त्याने युट्युब याबरोबरच सोशल मिडीयाच्या माध्यमातून परीक्षेच्या तयारीबाबतची माहिती घेतली, अधिकारी झालेल्या तरुणांचे व्हिडीओ त्यांच्या मुलाखती बघितल्या, अशा अनेकांच्या मुलाखतीतून त्यांनी वाचलेल्या पुस्तकाची यादी शुभमला मिळाली, अशा पध्दतीने अनेक मुलाखती पाहून प्रत्येकाचा संदर्भ घेत शुभमने अभ्यासासासाठी निवडक अशा स्वत:ची पुस्तकाची लिस्ट तयार केली. खाजगी क्लास लावण्यासारखी कुटुंबाची परिस्थिती नव्हती, त्यामुळे घरच्या घरीच शुभम अभ्यास करायला लागला. वडीलानंतर आईचे जबाबदारी स्विकारली, अन् कष्ट केले, तिचे कष्ट शुभम त्याच्या डोळ्यांनी पाहत होता, हे कष्ट पाहूनच शुभमला मोठी उर्जा मिळायची. अशा पध्दतीने शुभमने कठोर परीश्रम आणि प्रचंड जिद्दीने अभ्यास केला.

सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदाच शुभमने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात शुभम हा परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी शुभमने जळगावला अभ्यासिका लावली. अभ्यासात कुठेही कमी पडू नये म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक मिळवत, शुभमने त्यांचे सुध्दा मार्गदर्शन घेतले. अशा पध्दतीने दिवसरात्र अभ्यास करुन २०२२ मध्ये झालेली मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत शुभमने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घातली व अवघ्या २५ व्या वर्षीच अधिकारी म्हणून अंगावर वर्दी चढविली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून शुभम हा गावातला पहिलाच अधिकारी झाला आहे. त्यामुळे शुभमचा त्याच्या गावकऱ्यांना मोठा अभिमान आहे. शुभमच्या माध्यमातून गावातला पहिलाच अधिकारी झाल्याच्या आनंदात संपूर्ण गावकऱ्यांनी शुभमची वाजत गाजत मिरवणूक काढली. आणि मोठा आनंद व्यक्‍त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

पती बेपत्ता झाल्याची पत्नीने दिली तक्रार...४० दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील कुविख्यात गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई ; येरवडा कारागृहात रवानगी !

June 7, 2023

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

December 15, 2023

गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह दोन जणांना अटक

January 7, 2022

बारा हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक !

October 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group