भुसावळ (प्रतिनिधी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. पर्यावरण, कला, रक्तदान आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. विविध क्षेत्रात काम करणारयांना या सन्मानातून प्रेरणा मिळते, तसेच या प्रेरणेतून इतरही लोक अनुकरण करुन तयार होतात, तसेच सन्मानातून कार्याची उर्मी वाढते, असे मत यावेळी आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले.
कोविडच्या काळात तसेच यापूर्वीही विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी छोटेखानी कार्यक्रमातून गुणवत्तांचा सन्मान करण्याचे नियेाजन केले आहे. यापूर्वीही विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला होता. तर नुकताच म्युकरमायकोसिसचे अभ्यासक डॉ. धर्मेंद्र पाटील, पर्यावरण प्रेमी व शहरात ६०० झाडांना पाणीपुरवठा करणारे रणजीत खरारे, नाट्कर्मी व राज्यस्तरीय पुरस्कार विजेते विरेंद्र पाटील, रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन रुग्णांचा जिव वाचविणारे सागर विसपुते व सतिश महाजन तसेच यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी आमदार सावकारे यांनी अशा वेगळे काम करणाऱ्यांचा सत्कार झाल्याने त्यांची प्रेरणा घेत इतर समाजाची सेवा करणारे नवीन लोक तयार होतात. यामुळे त्यांचा कार्याचा सन्मान होणे गरजेचे असते. यामुळेच आगामी काळातही वेगळे सामाजिक काम करणाऱ्यांचा हूरुप वाढविण्यासाठी सन्मानपत्र देवून गौरव केला जाणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील, वैद्यकीय आघाडी जळगाव ग्रामीण अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष अमित असोदेकर, शिवाजी नगर संघ कार्यवाह कमलेश छगनलाल निकुंभ, व्यावसायिक प्रवीण वारके आदी उपस्थित होते.
















