धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव येथील एका घराच्या अंगणातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अनिल रामदास निकुंभ (वय ४५, रा. हिरापूर ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ एप्रिल २०२२ रोजी रात्री ०१.३० वा. ते ०६.०० वा. दरम्यान २० हजार रुपये किंमतीची लाल मारून रंगाची बजाज कंपनीची बॉक्सर मोटारसायकल क्र. एम. एच १९ एन ४४२८ हि बोरगाव ता. धरणगाव येथुन महेश निबां मराठे यांच्या घरासमोर अंगणात लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी च्या संमती वाचुन लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना दिपक पाटील करीत आहेत.
















