धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील साईबाबानगर येथील एका घराच्या पोर्चमधून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात लक्ष्मण माधव नाव्ही (वय ५४, रा. साईबाबा नगर एरंडोल रोड धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ एप्रिल २०२२ रोजी रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान लक्ष्मण नाव्ही यांची ३० हजार रुपये किंमतीची काळ्या व निळ्या रंगाची एच.एफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल (क्र. एम.एच १९, सी.एस. ८०७२) ही साईबाबानगर धरणगाव येथील घराच्या पोर्चमध्ये लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ योगेश जोशी हे करीत आहेत.