सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना बोगस दाखला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच प्रकरणी शिवसिध्द बुळा याचा बनावट दाखला तयार करण्यात हात? असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. यामुळेचं सोलापूर शहर गुन्हे शाखेने बुळा यास ताब्यात घेतले आहे.
सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
खासदारकी वाचवण्यासाठी धडपड
सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे. अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोलापूर शहराचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं आहे. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना करुन ते सामाजिक कार्यात सहभागी झाले. सोलापुरात त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मितीही त्यांनी केलीय.