मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील पोलीस स्थानकाचे निरिक्षक राहूल खताळ यांची आज जळगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. स्वत: श्री. खताळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपण उद्या सकाळी नियंत्रण कक्षात रूजू होणार असल्याची माहिती राहूल खताळ यांनी दिली. तर ही बदली प्रशासकीय कारणांवरून झाली असल्याचे ते म्हणाले. तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यातच मुक्ताईनगरातील अवैध धंद्यांचा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला होता. या पार्श्वभूमिवर, आज राहूल खताळ यांची झालेली बदली लक्षणीय मानली जात आहे. तर त्यांच्या जागी अद्यापही कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आता मुक्ताई