भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याने प्रवासी स्थानकावरच थांबून जातात, यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांच्या कालावधी वाढविण्यात आला आहे.
रेल्वे गाड्यांना प्रवाशांची असलेली अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर दरम्यान धावणार्या विशेष रेल्वे गाड्या चालवत असल्याने यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याने प्रवासी स्थानकावरच थांबून जातात, यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांच्या कालावधी वाढविण्यात आला आहे.
यात 02188 विशेष मुंबई-रीवा ही गाडी 29 सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी चालविली जायची, तिला 1 डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे. तसेच 02187 ही विशेष गाडी 28 सप्टेंबरपर्यत दर गुरूवारी चालविली जात होती, ती आता 30 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे तसेच 02131 पुणे -जबलपूर ही सुपरफास्ट विशेष गाडी 24 सप्टेंबरपर्यत दर सोमवारी चालत होती ती आता 25 नोव्हेंबरपर्यत चालविली जाणार आहे.
02132 जबलपूर-पुणे सुपरफास्ट स्पेशल ही गाडी 24 सप्टेबर दर रविवारी चालविली जात होती, ही गाडी आता 26 नोव्हेंबरपर्यत चालविली जाणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, आणि गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या गाड्यांचे आरक्षण 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे.