मुंबई (वृत्तसंस्था) हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी मुंबई हादरली आहे. मुंबईतील (Mumbai) अँटॉप हिल परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. तर दुसरीकडे लालबागच्या चिवडा गल्लीत भावाकडूनच धाकट्या भावाची हत्या करण्यात आली आहे.
हत्या करुन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
लालबागमध्ये भावानेच केली भावाची हत्या
तर दुसरी हत्येची घटना लालबागमध्ये घडली आहे. लालबागच्या चिवडा गल्लीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. काळाचौकी परिसरात भावानेच धाकट्या भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोठ्या भावाने धाकट्या भावावर चाकू हल्ला करत हत्या केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळाचौकी परिसरात राहणाऱ्या दोन भावंडांपैकी लहान भावाचे मोठ्या भावाच्या मित्रांसोबत भांडण झाले. यानंतर मोठ्या भावाने आपल्याच लहान भावावर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली. हत्येची घटना लालबागमधील चिवडा गल्लीत घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काळाचौकी पोलिसांनी मोठा भाऊ अशोक भरुगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अशोक हा ३० वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे.