TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र जैन तिचे दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा थाटामाटात संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
November 27, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील जुने प्रतिष्ठान रवींद्र गृह वस्तू भांडार चे संचालक दिपाली व रवींद्र नरसी जैन यांची सुपुत्री मुमुक्षु आत्मा जिनल रवींद्र लोडाया ह्या 11 डिसेंबर 2024 रोजी दीक्षा ग्रहण करणार असून त्यानिमित्त चोपडा शहरात वर्षीदान वरघोडा कार्यक्रम संपन्न झाला.

सदरील वरघोडा बाजारपेठेतील प्रिया जनरल येथील निवासस्थानापासून सुरुवात होऊन चावडी ,गोल मंदिर, विद्यासागर जी महाराज मार्ग, राणी लक्ष्मीबाई चौक गांधी चौक ते परत मेनरोडमार्गे मुनी सुव्रत स्वामी जैन मंदिर येथे समारोप करण्यात आला.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

सुरुवातीला बँड पथक तद् नंतर पुरुषवर्ग शांतिनाथ भगवानचे भव्यरथ त्यामागे साध्वी भगवंत प पू.प्रमोदिताश्रीजी महाराज व त्यांचे सुशिष्या व महिला मंडळाचे सदस्य व सर्वात शेवटी दीक्षार्ती भगिनीचे रथ असे मार्गक्रमण करत होते. नवयुवक मंडळाच्या सदस्यांनी भगवान महावीरांची स्तुती गीते व भजने गाऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. शांतिनाथ भगवान यांचे रथावर पुष्प वर्षा व अक्षत वर्षा करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी आरती करण्यात आली. त्यानंतर जैन मंदिर येथे समारोप करण्यात येऊन जैन समाजाचे सर्व प्रमुख संस्थांद्वारा दीक्षार्थी भगिनीचे सत्कार करण्यात आले.

छोटेखानी समारोह चे दीपक राखेच्या यांनी सूत्रसंचालन करतांना लोढाया परिवाराने आजपर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख केला कु जिनलचे चुलत भाऊ वहिनी व पुतणी यांनी सुद्धा जैन धर्माचे दीक्षा ग्रहण केली असून जैन धर्माची प्रचार आणि प्रसार करत आहे. व परिवाराकडून समाजाला समर्पित केलेल्या जागेवर आज सुंदर असे मंदिर दिमाखात उभे आहे, असे नमूद केले. तारण तरण जैन समाजाचे स्वाध्यायी आझाद भाई जैन, वर्धमान जैन श्री संघाचे माजी संघपती प्रा.सुरेश अलिझाड, व माजी संघपती माणकचंद चोपडा या वक्तांनी जैन धर्मात संयम मार्ग किती खडतर आहे व प्रशस्त पण आहे याचे महत्व सांगत मोक्षप्राप्ती साठी संयम शिवाय पर्याय नाही हे पटवून दिले.

जिनल बेन च्या जीवन परिचय व धार्मिक अभ्यासाची माहिती दीपा शहा मॅडम यांनी करून दिली. शेवटी प्रवचनमध्ये सांगताना त्यागाची महिमा व त्याग करणाऱ्याची महत्ता किती मोठी आहे. याचे उदाहरणासह साध्वी भगवंतांनी सभेला उदबोधित केले. त्याग व संयम धारणार्यांना सर्वोच्च स्थान असते व त्यांचे गुणगान करण्यासाठीच आपण सर्वजण येथे आलेलो आहोत, हे अधोरेखित केले.

शेवटी आभार जितेंद्र बोथरा यांनी मानले व मांगलिक श्रवणाने सभेची सांगता झाली. रात्री साडेआठ वाजता प्रताप विद्या मंदिर येथे मुंबई निवासी ईशान भाई शहा संचलित संयम संवेदना समारोह संगीतकार कुशल भाई शेठ यांचे उपस्थितीत पार पाडला. समारोह मध्ये आई-वडिलांची महत्त्व, गुरुचे स्थान, परिवाराचे स्नेहीजनांचे पाठबळ व समाज बंधूंचे आशीर्वाद या सर्वांचे योगदान संयमीजीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह पटवून दिले.

कुमारी जीनेलने मनोगत व्यक्त केले की कोरोना काळात माझे मनोबल खचले होते तेव्हा धर्म ग्रंथाचे वाचन साधू महाराजांचे उपदेश गुरुनी मैयाचे मार्गदर्शन यामुळे मागील दोन वर्षापासून माझ्या मनात वैराग्य भाव जागृत झाले व येणाऱ्या 11 तारखेला चाळीसगाव येथे दीक्षा महोत्सव मध्ये सर्वांनी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

दोन्ही कार्यक्रमासाठी खानदेशातून विविध ठिकाणाचे समाज बांधव तसेच चोपडा तालुक्याचे सर्व समाजातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादावाडी नवयुवक मंडळ, भारतीय जैन संघटना चे सदस्य व समाज बांधवांनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

मूल्य शिक्षणासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी उपयुक्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा फेरा ; ‘एनसीबी’चे पथक आज मुंबईत होणार दाखल

October 27, 2021

गटारींची स्वच्छता करा, अतिक्रमण तात्काळ हटवा ; उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

December 15, 2020

अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ; भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

September 24, 2020

उद्यापासून राज्यात १५ दिवस रात्री संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group