चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू) मोरे यांची गोळ्या झाडून हत्या करणार्या संशयितांपैकी दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सचिन सोमनाथ गायकवाड (घाट रोड, चाळीसगाव) व अंनिस उर्फ नव्वा शेख शरीफ शेख (हुडको, चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून अटक !
गोळीबार करणार्यांपैकी संशयित सचिन गायकवाड व अनिस शेख हे पुण्यातील लोणीकंद परीसरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली व संशयितांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई !
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक राहुल पाटील आदींच्या पथकाने केली. या कारवाईत हवालदार अक्रम शेख याकूब, हवालदार महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, हेमंत पाटील, किशोर मोरे, ईश्वर पंडित पाटील आदींच्या पथकाने केली.