जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून तरुणाचा खून केल्याची घटना खोटेनगर परीसरातील पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.
याबाबत वृत्त असे की, महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. खोटे नगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटील यांना मागील भांडणाच्या कारणावरून एकाने धारदार शस्त्राने भोसकल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास घटना घडली. खुन झाल्यानंतर परीसरातील नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. तालूका पोलीस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला होता. या घटनेमुळे खोटे नगर परीसरात खळबळ उडाली आहे.
















