भुसावळ (प्रतिनिधी) या अपघातात आपल्या बहिणीच्या आणि भाच्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याच्या संशयावरून शालाकाने दीड महिन्यापूर्वी नातेवाईकाच्या मदतीने तिच्या मेव्हण्याची हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत राजु शामराव मिरटकर (वय 28, रा. मोताळा) हा भुसावळ येथे बहिणीकडे वास्तव्यास होता. मयत हा मे 2020 मध्ये पत्नी व मुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. यात मयत बचावला होता. त्यामुळे शालक रामेश्वर गायकवाड (वय 22, रा.कोथळी, ता.मोताळा. जि.बुलढाणा) याला मयत राजु यानेच बहिणीला मारल्याचा संशय होता. त्यातून त्याने राजु याला संपविण्याचा डाव रचला व त्याचा घात केला. साधारण दिड महिण्यापूर्वी 9 ऑक्टोबरला राजु हा भाच जावयासोबत मोताळा येथे गेला होता. तेथून तो परतला नव्हता. याबाबत मयत राजुची बहीण सुनीता युवराज पवार (रा. यावल रोड, भुसावळ) यांनी 30 ऑक्टोबर रोजी बोरखेडी (ता. मोताळा) पोलिसात भाऊ हरविल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर मयताचे भुसावळ येथील यावल नाका परिसरातून अपहरण झाल्याचे उघडकीस आले. यानंतर 20 नोव्हेंबरला हा गुन्हा भुसावळ शहर पोलिसत वर्ग करण्यात आला.
त्यानंतर डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.स्टे.चे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व एपीआय संदीप डुनगहू यांच्यासह सहकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवत रमेश रामदास पवार (रा.कंडारी, ता.भुसावळ) याला 22 नेाव्हेंबरला ताब्यात घेऊन तपास चक्रे फिरविली असता त्याने, राजूचा शालक रामेश्वर याच्या मदतीने त्याचा घात केल्याचे सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन. विचारपुस केली असता. खुन नांदुऱ्याजवळ कोठेवती केला आहे. नेमका कोठे केला हे सांगता येणार नसल्याचे आरोपींनी सांगितल्यानंतर. या गुन्ह्यात खुनाच्या दिशेने तपास करणे कठीण होत होते.