अमळनेर (प्रतिनिधी) पैगंबरवासी नबी खान यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र इंजिनिअर लईकुर्रहेमान यांनी दिवाळी निमित्त गोरगरिबांना फराळ वाटपासाठी लायन्स क्लबला २५ हजार रुपये दिले. या रकमेतून क्लबने मिठाई आणि फरसाण विकत घेऊन गांधली पुरा, ताडे पुरा, कचेरीच्या पाठीमागे , सार्वजनिक बांधकाम विभागा जवळील गोरगरीब वस्तीत वाटप केले आहे.
खान यांनी दाखविलेल्या औदार्याबद्दल क्लबचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी त्यांचा फराळ वाटप प्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी क्लबचे सेक्रेटरी विनोद अग्रवाल , माजी प्रांतपाल डॉ.रविंद्र कुलकर्णी, डॉ.रविंद्र जैन, प्रशांत सिंघवी , येझदी भरूचा, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे , राजू नांढा , पंकज मुंदडे , नीरज अग्रवाल, महावीर पहाडे ,प्रसन्न पारख , नासिक येथील निवृत्त पोलिस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी , सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त राजू नेरकर (नासिक) उपस्थित होते.
















