नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) लखनौपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यातील एका मशिदीबाहेर एका सभेला संबोधित करतानाच्या व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे. ज्यामध्ये एक भगवे कपडे परिधान केलेल्या एका व्यक्ती मुस्लिम महिलांचे (Hindu Priest Threrat Muslim Women) अपहरण आणि बलात्कार करण्याची धमकी देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ आहे उत्तरप्रदेशातल्या सीतापूर भागातल्या मशिदीच्या बाहेरचा. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भगवे कपडे परिधान केलेला महंत जीपमध्ये बसला आहे आणि जमावासमोर भाषण देत आहे. हा महंत खैराबाद इथल्या असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये या महंताच्या मागे पोलिसही उभे असल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ही घटना २ एप्रिल रोजी घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये भगवे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती म्हणत आहे की, जर या भागातल्या कोणत्याही हिंदू मुलीला काहीही त्रास झाला तर मुस्लीम महिलांचं अपहरण केलं जाईल आणि सार्वजनिकरित्या त्यांच्यावर बलात्कार केला जाईल. या व्यक्तीच्या अशा वक्तव्यानंतर आजूबाजूला जमलेले नागरिकही जय श्रीराम अशा घोषणा देताना दिसत आहे. या प्रकरणी सीतापूर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे आदेश सीतापूर पोलिसांनी दिले आहेत.