धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात १२ ते १८ एप्रिल या कालावधी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध विषयांवर राजांनी मार्गदर्शन केले. सणवार व्रतवैकल्य यांची प्रत्यक्ष मांडणी दाखवून प्रबोधन केले.
त्यात सेंद्रिय शेती, गर्भसंस्कार बालसंस्कार, मानवी जीवनात येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पक्षी पाणवठा, सीडयॉल रायार करणे याबाबत बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक दाखविले तसेच स्वयंरोजगार विभागातर्फे गायीच्या शेणापासून वस्तू तयार करण्यात आल्या. त्यात शेणाचे हळदी कुंकूचे करंडे, दिवे, लक्ष्मी पावले, तोरण, आरसे, रांगोळी, औक्षण सुपारी, स्वस्तिक आदी साहित्य तयार करण्यात आले. बाल संस्कार केंद्राच्या विद्याथ्यांकडून विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले. चैत्र गौरीचे कार्यक्रम महिलांनी सादर केले. त्यात उखाणे, गौरीची गाणी सादर केली. सप्ताह काळात २५० महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र पारायण सेवेत सहभाग घेतला. तसेच हजारोच्या संख्येने श्री स्वामी समर्थ मंत्र जप, गायत्री मंत्र जप, नवार्णव मंत्र जप, श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री मल्हारी सप्तशती पाठ करण्यात आला. शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित सेवकन्यांनी सहकार्य केले.