नागपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नेहमी विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी देशातील प्रत्येक कार्यालयात शस्त्रपूजन करतो. ते शस्त्रपूजन आता वादात सापडले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ते मोहनीश जबालपूरे यांनी याविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने नागपूर शहर पोलिसांच्या कोतवाली पोलीस स्टेशनला नोटीस बजावली. तसेच जबलापुरे यांच्या प्रकरणात चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
संघाची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी झाली. या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा आहे. संघाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात दरवर्षी शास्त्रपूजन हे विशेष असते. मात्र, आता यावर काँग्रेसचे कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी आक्षेप घेतला आहे. संघाकडे असलेल्या आणि विजयादशमीच्या दिवशी संघाच्या नागपुरातील मुख्यालयात शस्त्रपूजन केल्या जाणाऱ्या शस्त्रा संदर्भातली त्यांनी माहिती मागितली होती. त्यासाठी त्यांनी २०१८ मध्ये स्थानिक कोतवाली पोलीस स्थानकाकडे याविषयीची माहिती अधिकारात माहिती मागितली होती. तसेच निवडणूक आणि इतर सणांच्या काळात नियमाप्रमाणे हे शस्त्र पोलिसांकडून जप्त केले जातात का? अशी विचारणा केली होती.
चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश –
पोलिसांनी याप्रकरणात कुठलेही उत्तर त्यांना दिले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयात सुनावणी झाली असून ‘नोटीस’ बजावण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने नागपूर शहर पोलिसांच्या कोतवाली पोलीस स्टेशनला ‘नोटीस’ बजावली. तसेच जबलापुरे यांच्या प्रकरणात चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही दिले आहेत.