नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेड ते साळवा मधील विशेष दुरुस्ती अंतर्गत 3 हजार 600 मीटरच्या अंदाजीत साडेतीन करोड रुपयांचे रस्त्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
नांदेड ते साळवा रस्त्याच्या कामाची नुकतीच युवासेना तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे, महेश रायसिंगे, आदिवासी सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, ग्रामपंचायत सदस्य संजय सैंदाणे, भरत कोळी यांनी पाहणी केली. रस्त्याचे काम भगवान महाजन यांनी घेतल्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा हा अतिउच्च असल्याची प्रतिक्रिया भरत सैंदाणे यांनी व्यक्त केली. या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे आणि दोन्ही गावातील नागरिकांची अडचण दूर होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिक शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि साळवा-नांदेडच्या ग्रामस्थांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.