धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्ती नांदेड रस्ता येथे जळगाव नारीशक्ती ग्रुपतर्फे दिवाळी फराळ व साड्या वाटप करण्यात आल्या. यात शेवचिवडा, मोहनथाल, शंकरपाळे व महिलांना साड्या यांचा समावेश असुन संजय भिल, काशिनाथ भील, मगन भील, अभिमन पिंपळसे, चंद्रभागा निकम, कमलबाई भील, रावली बारेला, दीपाली मोरे, चंदा भील, ममता बारेला अशा १५० कुटुंबाना वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हा परिषद सदस्य माधुरीअत्तरदे, नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सरपंच ईशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सदस्य मनोज सोपान अत्तरदे, सदस्य चंद्रलेखा सतीश पवार, सदस्य भूषण बऱ्हाटे, सदस्य आशा संजय कोल्हे, ग्रामविकास अधिकारी तुकाराम मराठे, पोलिस पाटील, निसार पटेल, संजय कोल्हे, नारीशक्ती ग्रुपच्या सुमित्रा पाटील, ज्योती राणे, ॲड. सीमा जाधव, भावना चौहान, नूतन तासखेडकर, किर्ती पाटील, विशाल भावसार, कल्याणी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गावातील दीपक भालेराव, किशोर बोरोले, किरण फालक यांचे अनमोल सहकार्य लाभले. सुत्रसंचालन साळवा येथील शिक्षीका व नारीशक्ती ग्रुपच्या ज्योती राणे यांनी केले. आभार तुकाराम पुंडलिक मराठे ग्रामविकास अधिकारी यांनी मानले.