नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. यासह ३ कातकरी कुटुंबांची घरे जाळण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
जमिनीच्या वादामधून हा प्रकार घडला असल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, बारशिंगवे (ता. इगतपुरी) या भागातील हे टोळके असून या टोळक्यात आदिवासी समाजाचे १० ते २० जण आहेत. जमिनीच्या वादातून या टोळक्याने शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कातकरी वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर, वस्तीतील ३ घरे सुद्धा या टोळक्याने जाळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्याला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.