भुसावळ (प्रतिनिधी) येथे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या राष्ट्रव्यापी चरणबध्द आंदोलन आयोजीत केले असून हे आंदोलन देशातील ३१ राज्य, ५५० जिल्हे आणि ५००० तालुकास्तरावर ५ टप्यामध्ये करण्यात येत आहे. याबाबत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले असून भुसावळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात अधिक असे की, पहिला टप्पा दिनांक १५ ऑक्टोबर २०२१, दुसरा टप्पा दिनांक २९ ऑक्टोबर २०२१, तिसरा टप्पा दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसिलदार कार्यालयावर धरणे आंदोलन रुपाने आहे. चौथा टप्पा दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी जेल भरो आंदोलन व पाचवा टप्पा दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण भारत बंद करण्याचे नियोजन असून त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या कार्यालयासमोर ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करणे, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी बनविलेल्या ३ काळ्या कायद्यांच्या विरोधात इलेक्ट्रानिक ओटींग मशिनच्या विरोधात खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करण्यासाठी व जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागु करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. आज रोजी भारतामध्ये १९३१ पासुन ओबीसींची जाती निहाय जनगणना केली नाही. त्यामुळे त्यांचा बजट व नोकरी व निवडणुक यामध्ये त्यांच्या असलेल्या जागा नसल्याने अनेक अडचणी निर्माण झालेल्या असुन यावर शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच शेतकरी आत्महत्या व कृषी कायदे विरोधामध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत शासन योग्य तो निर्णय घेत नसून त्वरित घेण्यात यावी अशी अपेक्षा असून निवेदन स्वीकार करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी सुधाकर बडगुजर, हरुन मनसुरी, रामराज परदेशी, बी. एस. सोनवणे, प्रमोद पींदुभाऊ उंबरकर, विलास रंदोळे, जिवन पाटील, सुनिल पाटील, विजय साहले, कल्पना म्हस्के, कांचन सोनवणे, अपर्णा म्हस्के आदींच्या निवेदनांवर सह्या आहे.