चाळीसगाव (प्रतिनिधी) आज रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे “निसर्ग योगसाधना व वृक्ष लागवड शिबीर” औट्रम घाटातील निसर्गरम्य मल्हार गड येथे रोटे रोशन ताथेड यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले.
यावेळी प्रकल्प प्रमुख रोटे. मधुकर कासार, रोटे. डाँ.सुनील राजपूत आदी उपस्थित होते, कासार यांनी योगासनामधील विविध प्रकार व त्यामुळे शरीराला होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. डाँ. सुनील राजपूत यांनी योगासन व प्राणायाम सुदृढ आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. सोबतच सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे दिलीप घोरपडे यांनी गड व किल्ले यांविषयी फार सुंदर माहिती दिली, यावेळी मंदिराच्या आवारात विविध प्रकारच्या १२ वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनासाठी जगवण्यासाठी त्याची लागवड कशा पद्धतीने झाले पाहिजे याची रोटे. नंदकुमार वाळेकर (BDO)यांनी तंत्रशुद्ध माहिती दिली. सह प्रकल्प प्रमूख विनोद बोरा, गणेश बागड, अजय गेमनानी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार सचिव रोटे. ब्रिजेश पाटील यांनी मानले.