मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी ने मुंबईत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने नुकत्याच केलेल्या कारवाईनुसार रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीला, ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली आहे. रिगल महाकालाल, असे अटक केलेल्या ड्रग्स सप्लायरचे नाव आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील एनसीबीनं मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. अनुज केशवानी जो रिया आणि सुशांतला ड्रग्ज पुरवठा करायचा, त्या अनुजला, रिगलकडून ड्रगचा सप्लाय होत होता. रिगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंधेरी पश्चिम भागात एनसीबीकडून छापेमारी केली जात आहे. उच्च प्रतीची मलाना क्रिम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रिगल महाकाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींशीही जोडलेला आहे. एनसीबी गेल्या अनेक काळापासून रिगलच्या शोधात होती.