जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महामार्गांची रखडलेली व धीम्या गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून आपण व्यक्तिगत लक्ष घालावे, यासाठी आज पवार साहेबांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भेट घेत यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
तसेच जिल्ह्यातील मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी व जिल्ह्यातील वाढीव विजबिलांसंदर्भात राज्य सरकारला निर्देश देण्यात यावेत यासाठी आज विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, ग्रंथालय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हे उपस्थित होते.