TheClearNews.Com
Thursday, July 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उत्साहात

भवानीमाता मंदिर डोम सभागृहाचे व विठ्ठल मंदिर सभागृहाचे लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2022
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला यावेळी मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे हे होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ ,राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, प स सभापती विकास पाटील, जि प सदस्य निलेश पाटील, माजी प स सभापती दशरथ कांडेलकर, ,राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील,तालुका अध्यक्ष यु डी पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, संदिप देशमुख, रामभाऊ पाटील, सुभाष टोके, डॉ बि सी महाजन,विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

यावेळी एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने इको टुरिझम निधी अंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्णत्वास गेलेल्या भवानी माता मंदिर येथील डोम सभागृहाचे आणि विठ्ठल मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी प्रक्रिये विषयी माहिती दिली.

रोहिणीताई खडसे खेवलकर या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, गेल्या तीस वर्षापासून आपण सर्व नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे राहिलात आता सुद्धा ही साथ अशीच कायम राहू द्या व येत्या सर्व निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा, आपल्या गावातून परिसरातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा, नाथाभाऊंनी सुरू केलेल्या आपल्या परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी ज्याप्रमाणे जोंधनखेडा धरणासाठी निधी उपलब्ध करून दिला तसा भरीव निधी या योजनेसाठी लवकरच प्राप्त होईल. आपल्या सरकारच्या माध्यमातून इतर विकास कामांसाठी सुद्धा निधी उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. येत्या काळात जि प, प स निवडणुका मध्ये नवे जुने, गट तट न करता पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून उमेदवाराला निवडणून आणून नाथाभाऊ व पक्षाचे हात मजबूत करावे. नाथाभाऊंनी गेल्या तीस वर्षात मतदारसंघात सर्वांगीण विकास केला. हा विकासाचा रथ पुढे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले कुऱ्हा वढोदा परिसरावर माझे विशेष प्रेम राहिले आहे गेल्या तीस वर्षा पासून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. पूर्वी या परिसरात येण्यासाठी रस्ते नव्हते माझ्या प्रयत्नातून आता प्रत्येक गावाला जाण्यासाठी तीन ते चार रस्त्यांचे निर्माण झाले आहे. या परिसरातील शेती बागायती व्हावी यासाठी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली. लवकरच या योजनेला भरीव निधी उपलब्ध होईल. गेले तीस वर्ष मी भाजपचे काम केले तुम्हा सर्वांच्या सोबतीने पक्षाचा विस्तार केला परंतु काहीही गुन्हा केलेला नसताना भाजप आपल्यावर अन्याय केला म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून जे प्रेम तुम्ही गेले तीस वर्ष माझ्यावर केले ते असेच कायम राहू द्या. राहिलेले विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, गेले तीस वर्ष आमदार – मंत्री असताना मतदारसंघात शांतता होती आज काही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत आहेत महिलांना फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत आपल्याला अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे त्यासाठी येत्या सर्व निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आहे.

यावेळी रमेश खंडेलवाल, रणजित गोयनका, मनिषा ताई देशमुख, पुंडलिक कपले, बाळा सोनवणे, पुरकर, विलास पुरकर, विष्णू पुरकर, पवन म्हस्के, महेश भोळे, रवींद्र दांडगे, वाल्मिक भोलानकर, सुनिता मानकर, बापू ससाणे, प्रवीण पाटील, शकील, भोसले व कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जिल्हा प्रशासन

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती !

March 18, 2025
गुन्हे

मुक्ताईनगरात मुलींची छेड काढणाऱ्या चौघांना अटक !

March 4, 2025
मुक्ताईनगर

खळबळजनक! मुक्ताईनगर येथे रक्षा खडसेंच्या मुलीची छेड

March 2, 2025
गुन्हे

वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांचा जिवघेणा हल्ला; एक संशयित ताब्यात !

February 14, 2025
Next Post

धरणगावात रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री येथे विवीध विकास कामांचे भुमिपुजन सोहळा संपन्न

July 25, 2021

बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार !

October 1, 2023

अल्पवयीन मुलासोबत ‘ओरल सेक्स’ हा गंभीर गुन्हा नाही ; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल

November 24, 2021

‘अर्ध्याहून अधिक संभ्रम दूर, जनहिताचा लढा जिंकेल’ ; निकालावर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group