चोपडा (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मालखेडा ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झालेले गणेश लोटन पाटील हे शिवसेनेचे गटाचेच सरपंच असून गावातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्या खातर राष्ट्रवादीचे नेते अरूणभाई गुजराथी यांच्या भेटीस्तव गेलेल्या फोटोंचा विपर्यास करून सोशल मीडियावर व्हायरल करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी जनतेने चुकीच्या संदेशाला बळी न पडता, मी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांचाच कार्यकर्ता असल्याचा खुलासा नवनिर्वाचित सरपंच गणेश लोटन पाटील यांनी केला आहे.
श्री.पाटील यांनी स्पष्ट केले आहे की,माझा राष्ट्रवादी पक्षाशी काही एक संबध नसून मी शिवसेनेचा ऐकनिष्ट कार्यकर्ता आहे. माझे नेते माजी आमदार आंणासाहेब चंद्रकांतजी सोनवणे आणि आमदार ताईसाहेब सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे हेच आहेत. दुसरे नेते माझे कोणिच होऊ शकत नाही मी लोकनियुक्त सरपंचपदी मालखेडा ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलो आहे मला माझ्या गावातील प्रशांत पाटील आणि शशिकांत पाटील यांनी पाठीबा दिला होता त्यामुळे मी त्याचा शब्दाखातीर राष्ट्रवादीचे नेते अरूणभाई यांच्या कडे गेलो होतो पण राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकत्यांनी माझे फोटो ग्रुपवर टाकून मला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.तरी चोपडा मतदार संघातील जनतेने अफवांना बळी न पडता मी शिवसेनेचाच (शिदे साहेब गट) एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट करतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे