भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस महानगर शिक्षक आघाडीतर्फे भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी का.उ.कोल्हे विद्यालयातील उपशिक्षक गौरव सुभाष भोळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०-२१ जाहीर झाला आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत भोळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दि, ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आकाशवाणी जळगाव येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.