बीड (वृत्तसंस्था) बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसाकर यांनी एका सभेला संबोधित करताना पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हटला. यावेळी क्षिरसागर यांनी पुष्पा स्टाईल ‘मैं झुकेगा नही…’ असं म्हणताच समोर बसलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने देशात अनेकांना भुरळ घातली आहे. त्यात विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांचाही समावेश आहे. सोशल मीडियात अनेकजण पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत असतात. आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसाकर यांनी देखील बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत समर्थकांची मनं जिंकली. यावेळी संदीप क्षिरसागर आगामी निवडणुकांबाबत बोलत असतांना त्यांनी पुष्पा स्टाईल ‘मैं झुकेगा नही…’ असं म्हणताच समोर बसलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.