जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आव्हाने शिवारातील गिरणा नदीपात्रातून विना क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून वाळुचा उपसा केला जात होता. दरम्यान, महसूल विभागातील महिलांच्या पथकाने वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टवर रविवारी दुपारच्या सुमारास कारवाई केली. ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जप्त करण्यात आले आहे.
तालुक्यातील आव्हाने शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु असल्याची माहिती महसुलच्या पथकाला मिळाली. त्यानुसार रविवारी दुपारच्या सुमारास महसूल विभागातील कानळदा मंडळ अधिकारी छाया कोळी, शिरसोली मंडळ अधिकारी सारिका दुरगुडे, चिंचोली तलाठी प्रतिक्षा नवले, धानवड तलाठी प्रिया डोंगरे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्यातील पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी यांच्या पथकाने गिरणा नदीपात्रात छापा टाकला. याठिकाणी विना क्रमांकाचे ट्रॅक्टरमध्ये वाळूचा उपसा सुरु होता. दरम्यान, पथकाने याठिकाणाहून विना परवाना वाळूचा उपसा करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.