मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होताच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत.
अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ घातला. कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मराठा आरक्षण आणि अधिवेशन कालावधीवरुन विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला आणि विरोधकांना एकत्रित बैठक घेत नियमावली तयार करण्याचं आवाहन केलं. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे”. असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. यावेळी ते म्हणाले की, “अनेक प्रश्न आहेत..दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही.
















