नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळा पूर्व तयारी या शासनाच्या धोरणानुसार शाळेचा संपुर्ण परिसरात रांगोळी काढण्यात येऊन विद्यालयात सजावट करण्यात आली. प्रथम दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे मंगलमय शहनाईच्या मंगल सुरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थांवर फुलांचा वर्षाव करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला.
तदनंतर श्री गणेश व सरस्वतीचे मातेचे पूजन नर्सरीचे विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन नर्सरी वर्गाचे उद्घाटन करण्यात आले तर माध्यमिक विभागात सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष डॉ विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक जनार्दन माळी, राजूदादा पाटील, डॉ संदीप महाजन, माध्यमिक नवनिर्वाचित मुख्याध्यापक सुनिता बनसोडे, पर्यवेक्षक एस वाय पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर संस्थेचे सर्व आदरणीय संचालकांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.