जळगाव (प्रतिनिधी) नूतन मराठा महाविद्यालयातील खोटे मस्टर तयार केल्याच्या दाखल गुन्ह्यात आज प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुखसह दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान, सरकारी वकील अँड. केतन ढाके यांनी अटकपूर्व जामीन अर्जाला जोरदार विरोध करत महत्त्वपूर्ण पाच मुद्दे न्यायालयासमोर मांडले.
यासंदर्भात अधिक असे की, गेल्या महिन्याला नूतन मराठा महाविद्यालयात खोटे मस्टर तयार करतांना जळगाव जिल्हा मविप्र अध्यक्ष अँड. विजय भास्करराव पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए बी वाघ, शिवराज मानके, पी ए पाटील यांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी रितसर फिर्याद देऊन तसेच मास्टर ताब्यात घेऊन गुन्हा देखील दाखल केला होता.
या प्रकरणी प्राचार्य डॉ. एल पी देशमुख यांच्यासह उपप्राचार्य ए बी वाघ, शिवराज मानके, पी ए पाटील यांनी जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज जळगाव न्यायालयाने संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, सरकारी वकील ऍड. केतन ढाके यांनी अटकपूर्व जामीनला जोरदार विरोध केला होता.
जामीन नामंजुरीचे कारणे
१) सदर गुन्हयातील फियादी अॅड विजय भास्कर पाटील यांनी फिर्यादमध्ये लेखी दिले की, ते (संचालक) तथा प्रभारी अध्यक्ष जळगाव जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज मर्या. जळगाव असून त्यांनी नमुद संशयित आरोपी यांनी कट रचून शासनास कोटयावधी रुपयाचे फायदयाकरिता शासनाची फसवणुक करण्याचे इरादयाने दिनांक १९/०७/२०२१ रोजी उपप्राचार्य यांचे कार्यालयात संस्थेतील हजेरीचे मस्टर बनावट तयार करित असतांना मिळून आल्याने त्यांनी सदरचे रजि ताब्यात घेतले व त्या संबंधी गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रारी अर्ज पो.स्टे. ला दिला. सदर अर्जाचे सविस्तर चौकशीवरुन ३१/०७/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) सदर गुन्हयात फिर्यादी यांनी पोलिस स्टेशनला सादर केलेले मस्टरचे अवलोकन केले असता सदर मस्टर हे जळगाव जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज मर्या. जळगावचे हजेरी पट असून त्यात १ ते ९३ पेज आहे. सदर मस्टर मध्ये १ ते ४ रिकामे रकाने असून ५ वर सौ ए.एल. भोळे ६ वर श्रीमती एम. ए. धामणे ७ वर श्री एन. एस. गावडे असे इंगजीत नाव टाकलेले असून त्यापुढे सहया केलेल्या आहेत. परंतु सदर रजि मध्ये १ ते ४पावेतो ओळीवर कोणतेही नाव अगर सहया नाही. त्यावरुन सदरचे मस्टर हे बनावट तयारकरित असल्याचे प्राथमिक दृष्टया दिसुन येते.
३) सदर मस्टरमध्ये कोणत्याही कार्यालयाचे हजेरीपट मस्टर हे ज्या दिवशी संबधीत व्यक्ती ही कर्तव्यावर हजर होते. त्याच दिवशी त्याची सही घेणे बंधनकारक आहे. परंतु नमुद रजि मध्ये केवळ ५६.७ क्रमांकावर नमुद कर्मचा-यांचे सन जुन २०१७ पासूनचे सहया घेवून तसेच सदर घटना ही १९ जुलै ची असतांनाची यातील एका कर्म (क्रमांक ६ वरील) ची दिनांक २३ जुलै २०२१ पावेतो सहया केल्याचे दिसून येत आहे. या वरुन सदर मस्टर हे बनावट तयार करित असल्याचे दिसून येते
४) सदर मस्टर वरुन नमुद कर्मचारी यांची सन २०१७ पासून हजेरी दाखवून व त्या आधारे सदर कर्मचारी यांचे वेतन प्राप्त करण्यासाठी शासनास अहवाल पाठवून त्या आधारे कोट्यावधी रुपये शासनाकडून प्राप्त करण्याचे व शासनाची फसवणूक करण्याचे उददेशाने तयार करण्यात येत असलयाचे फीर्यादी यांचे म्हणणे आहे
५) यातील जामीन अर्जदार हे प्राचार्य या पदावर कार्यरत असून सदर मस्टर हे त्यांचे अभिरक्षेत असणे आवश्यक आहे तरीही त्यांनी दिनांक १९/०७/२०२१ रोजी मस्टर उपप्राचार्य संशयित आरोपी क्रमांक ३ यांचे ताब्यात देवून कटात सामील कर्मचा-याच्या सहया घेण्याचे उददेशाने म्हणजे बनावट हजरीपट तयार करण्याचे उददेशाने दिल्याचे तपासात दिसून येत आहे.