नांदेड (प्रतिनिधी) येथील गट नंबर १६४१ मधील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीच्या जागेचे भूमिपूजन नुकतेच सरपंच पुनम प्रशांत अत्तरदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी जिल्हा परिषद सदस्य माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचा सततच्या पाठपुराव्यामुळे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. याप्रसंगी सरपंच /उपसरपंच व सर्व ग्रां प सदस्य व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते हजर होते. यावेळी गावातील नागरिकांनी जि.प. सदस्य माधुरी चंद्रशेखर अत्तरदे व चंद्रशेखर अत्तरदे यांचे आभार मानले.