भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना महामारीमध्ये भुसावळ तालुका नव्हे तर शेजारील तालुक्यातील नागरिकांना देखील यथायोग्य उपचार ग्रामीण रुग्णालयात मिळत असून त्यांच्या प्रशासकीय कार्यात आपला हातभार लागावा म्हणून ४ कपाट, १२ खुर्च्याआणि ३ पल्सऑक्स मीटर भेट म्हणून दिल्याचे माजी नगरसेवक निक्की बत्रा यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, ग्रामीण रुग्णालयात मदतीचा ओघ सुरू झाला. उपचारासाठी मिळणारी मेडिकल मदतीसोबत प्रशासकीय कार्यालयात सुलभता यावी, कागदपत्रे ठेवण्यासाठी, औषधें आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षितता राहावी यासाठी आज आ. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जनसेवक निक्की बत्रा यांनी २ मोठे, २ छोटे कपाट, १२ खुर्च्या आणि नवीन रुजू झालेल्या डॉक्टर मंडळींसाठी ३ पल्सऑक्स मीटर देण्यात आले.असें जवळपास ६२ हजार रुपयांची सामग्री भेट देण्यात आली.
यावेळी डॉ. भालचंद्र चाकूरकर, डॉ. शुभांगी फेगडे, डॉ. सिद्देश पाटील, डॉ. वैभव निकम, डॉ. वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील, शहर अध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, अजय नागरणी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, रुग्णालय स्टाफ एलियास शेख, गणेश चौधरी, पंकज येवले, कुणाल जगताप, योगेश गायकवाड तसेच अनिल रोहरा, दिनेश दोदानी, सोनू सचदेव, केशव गेलानी, राहुल मेहराणी गुलशन वादवाणी आदी उपस्थित होते.
मातृदिन आयुष्यभर स्मरणात राहील
ग्रामीण रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयात सुलभता यावी म्हणून मदत दिली आहे. आगामी काळात देखील अशीच मदत सुरू राहील. त्यातच आज मातृदिन असल्याने आजचे कार्य आयुष्यभर स्मरणात राहील. असे भुसावळ नगरसेवक निक्की बत्रा यांनी सांगितले.