एरंडोल (प्रतिनिधी) तालुका शेतकरी संघ अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली असून काँग्रेसचे निळकंठ शंकर पाटील बाबुळगाव यांची सर्वपक्षीय एकमताने निवड करण्यात आली.
त्यानिमित्ताने त्यांच्या सत्कार काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश सचिव डी. जी. पाटील, तालुकाध्यक्ष रतिलालनाना चौधरी, उपाध्यक्ष चंदन पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र न्हाळदे, सरचिटणीस जगदीश चव्हाण, महेश पवार आदी उपस्थित होते.