जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडदा येथे सर्पदंशाने एका नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली.
तालुक्यातील वावडदा येथील बिसमिल्ला सिरस तडवी यांना मुलगा झाल्याने त्यांच्याकडे घरगुती कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने यावल तालुक्यातील सावखेडा येथे राहणाऱ्या मोठ्या भावाचा मुलगा मयुर संजू तडवी (वय-९) हा आजीसोबत बुधवार दि. १८ रोजी वावडदा येथे आला होता. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराजवळ काही मुलांसोबत खेळत असतांना मयूरच्या पायाला सर्पदंश झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी मयूरला मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पो.हे.कॉ. अतुल पाटील हे करीत आहे.