मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविला आहे. तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रवणबाळ’ जन्माला घातला आहे का?, असा सवाल ठाकरे यांना केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही जणांना तर माणसाचे नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्यावर नितेश राणे यांनी दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रवणबाळ’ जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती दिशा सलेनची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.